पुण्यात कर्नाटकच्या गाड्यांची सोडली हवा, स्वराज्य संघटनेचे कन्नडिकांविरोधात आंदोलन !
कर्नाटकमध्ये केलेल्या उच्छादाला ‘स्वराज्य’चे प्रत्युत्तर ! – डॉ. धनंजय जाधव, प्रवक्ते, स्वराज्य
पुणे – कर्नाटकात महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर छत्रपती संभाजीराजेंच्या ‘स्वराज्य’ संघटनेकडून कन्नडिकांविरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘स्वराज्य’ संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या गाड्यांची हवा सोडण्यात आली, तसेच कर्नाटकातील वाहनांवर स्वराज्य संघटनेचे ‘स्टिकर’ लावण्यात आले आणि गाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून कन्नडिकांचा निषेध नोंदवण्यात आला. कर्नाटकमध्ये केलेल्या उच्छादाला ‘स्वराज्य’चे प्रत्युत्तर आहे, असे ‘स्वराज्य’ संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी सांगितले.