संत एकनाथांनी दत्तात्रेयांचे केलेले वर्णन !
एकनाथांनी एका अभंगात दत्तात्रेयांचे वर्णन करतांना म्हटले आहे,
दत्त वसे औदुंबरी । त्रिशूल डमरू जटाधारी ।।
कामधेनू आणि श्वान । उभे शोभती समान ।।
गोदातीरी नित्य वस्ती । अंगी चर्चिली विभूती ।।
काखेमाजी शोभे झोळी । अर्धचंद्र वसे भाळी ।।
एका जनार्दनी दत्त । रात्रंदिन आठवीत ।।
अर्थ : ब्रह्मा, विष्णु, महेशांचा समन्वय दाखवणारी तीन मुखे, सहा हात, वरच्या दोन हातांत शंख आणि चक्र (विष्णू द्योतक), मधल्या दोन हातांत डमरू आणि कमंडलू (शिवाचे द्योतक) आणि खालच्या दोन हातांत माला चर्चिलेली, पायी खडावा, व्याघ्रांबर परिधान केलेले आणि काखेत झोळी असलेले, मागे गाय आणि आसपास चार श्वान (कुत्री) असलेले दत्तात्रेयांचे ध्यान वाचकांना सुपरिचित आहे. (साभार : संकेतस्थळ)