‘न भूतो न भविष्यति ।’, असा दैवी प्रवास अविरत करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
|
‘भूमंडलावरील आसुरी शक्तींचे जाळे भेदणार्या, भूमंडल शुद्ध करणार्या, तीर्थक्षेत्रांना उर्जित (तीर्थक्षेत्रांच्या चैतन्यात वाढ) करणार्या, भक्तांना आश्वस्त करणार्या, दैवी शक्ती कार्यरत करणार्या, समाजातील संतांना गुरुदेवांच्या अवतारी कार्याशी जोडणार्या, साधकांना साधनेसाठी ऊर्जा देणार्या, हिंदु राष्ट्राचा इतिहास निर्माण करणार्या, मानवजातीसाठी ज्ञानरूपी धरोहर (वारसा) देणार्या, दिव्य अलौकिक ईश्वरी घटनांची माहिती देणार्या; मुक्तीची प्रतीक्षा करत असलेले पितृगण, क्रांतीकारक, हुतात्मा, सैनिक आणि अत्याचार सहन करणार्या जिवांना मुक्त करणार्या; गुरुदेवांच्या अवतारी कार्यातील वैश्विक घटनांना चालना देणार्या, गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) अवतारी (टीप) कार्याला चित्रांमध्ये बांधणार्या, कालचक्रात पालट घडवून आणणार्या, आवश्यकतेनुसार सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा समतोल राखणार्या, चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पहायला शिकवणार्या आणि निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करणारा प्रवास करणार्या’ आज या भूमंडलात कोणी असतील, तर त्या म्हणजे सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
टीप : महर्षींनी सांगितले आहे, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीमन्नारायणाचे अंशावतार आहेत !’’
गुरुदेवांच्या अवताराचे महत्त्व सर्वांना तळमळीने सांगणार्या आणि त्यासाठी दूरदूरच्या साधकांपर्यंत जाऊन त्यांना भेटणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी आम्ही सनातनचे सर्व साधक वंदन करतो !’
– श्री. विनायक शानभाग, (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) (२१.११.२०२२) भाग्यनगर, तेलंगाणा. (१८.११.२०२२)