गुरुकार्यात स्त्रीत्वाची बंधने आड येऊ न देता अविश्रांत सेवा करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
- पुरुषांना सामाजिक बंधने अत्यंत अल्प असतात. स्त्री म्हणजे शौच, अशौच, सामाजिक आणि कौटुंबिक बंधने आली. श्रीचित्शक्ति या एक स्त्री आहेत. त्या मुलगी, बहीण, पत्नी आणि आई आहेत. ही सर्व नाती अत्यंत सुंदरपणे जपणे, सर्वांशी प्रेमाने वागणे, त्यांना देवाशी जोडणे आणि सर्वांना आनंद देणे, हे त्यांना लीलया जमते.
- स्त्री असूनही अविश्रांत प्रवास करणे अत्यंत कठीण आहे. ४ पुरुष साधकांना समवेत घेऊन गुरुकार्यासाठी प्रवास करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू धन्य आहेत ! म्हणून त्यांच्यासारख्या त्याच आहेत.’
– श्री. विनायक शानभाग, (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४० वर्षे) भाग्यनगर, तेलंगाणा. (१८.११.२०२२)