श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून साक्षात् आदिशक्ती जगदंबा पृथ्वीवर वास करत आहे ! – सप्तर्षी
भक्त त्यांच्या त्यांच्या भावानुसार, अनुभूतीनुसार, साधनामार्गानुसार भगवंताचे वर्णन करतात ! भगवंताचे प्रत्यक्ष रूप कसे आहे, हे तर केवळ वेद, उपनिषदे यांमध्येच वर्णन केलेले असते. त्याचप्रमाणे अवतारांचेही माहात्म्य आहे. सनातनची अवतारी गुरुपरंपरा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी साधकांना पुष्कळ प्रचीती आल्या आहेत. असे असले, तरी त्यांचे खरे स्वरूप मात्र भगवंतालाच ज्ञात आहे. लाखो वर्षांपूर्वी सप्तर्षींनी त्यांच्या अवतारी कार्याविषयी, त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याविषयी जे लिहून ठेवले आहे, त्याचे मानवी वाणीने वर्णन करणे केवळ अशक्य आहे ! या लेखातून सप्तर्षींनी विविध प्रसंगी नाडीपट्टीवाचनाद्वारे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या आध्यात्मिक अधिकाराविषयी काढलेले गौरवोद्गार पाहूया !
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना देवतांचे आशीर्वाद !
अ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सरस्वतीचा कृपाकटाक्ष लाभलेला असणे : सप्तर्षी सांगतात, ‘हे कार्तिकपुत्री (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ), आम्ही तुला ज्ञानपुत्री म्हणतो. तुला देवी सरस्वतीचा कृपाकटाक्ष लाभलेला आहे. बुद्धी आणि ज्ञान हे दोन्ही वेगवेगळे आहेत. कार्तिकपुत्रीकडे ज्ञान आहे. ज्ञानप्रदायिनी देवता श्री सरस्वती आहे. सरस्वतीचा अखंड आशीर्वाद असल्यानेच कार्तिकपुत्रीला ज्ञान लाभले आहे.’ – सप्तर्षी (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक १९८ (१५.४.२०२२))
(‘हो. असेच आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी १२ वर्षे ईश्वराकडून ज्ञान प्राप्त करण्याची सेवा केली आहे. सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ७५ हून अधिक ग्रंथांच्या त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समवेत सहसंकलक आहेत.’ – संकलक)
आ. कार्तिकपुत्रीच्या प्रवासाला विविध रूपांतील देवतांचे संरक्षण ! : ‘कार्तिकपुत्री पृथ्वीवर जेथे जेथे प्रवास करते, तेथे तेथे तिच्यासमवेत वीरबाहु नावाची एक देवता असते.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक २०७ (१८.७.२०२२))
इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या साहाय्यासाठी देवता छाया रूपात सतत समवेत असणे : ‘आदिशक्तीचा अवतार असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर हंसवाहिनी श्री सरस्वतीदेवी, द्वादश आदित्य, एकादश रुद्र, सूर्य, चंद्र, सप्तॠषी, सप्तमातृका, नारद-तुंबरू हे सर्व छाया रूपाने सतत त्यांच्या समवेत असतात. श्रीविष्णूचे वाहन गरूड आणि श्री महालक्ष्मीचे वाहन घुबडही असते.’ – सप्तर्षी (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक २०४ (१४.६.२०२२))
ई. ‘आदिशक्ती जगदंबा छायारूपाने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून पृथ्वीवर वास करत आहे !’ – सप्तर्षी (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक १४५ (१७.५.२०२२))
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दैवी कार्य
अ. कार्तिकपुत्रीने केलेल्या प्रवासामुळे सनातन संस्था, सनातनचे आश्रम आणि सर्वत्रचे साधक यांचे रक्षण होते ! : ‘कार्तिकपुत्रीने दैवी प्रवासाला आरंभ केल्यावर तिचा साधनेत संत, सद्गुरु आणि आता गुरुदेवांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ असा प्रवास झाला. त्यामुळे या दैवी प्रवासाला पुष्कळ महत्त्व आहे. कार्तिकपुत्रीने आतापर्यंत अनेक दिशांना प्रवास केला आहे. कार्तिकपुत्रीने (सप्तर्षींच्या आज्ञेने विविध मंदिरांमध्ये पूजा करण्यासाठी आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यासाठी) केलेल्या प्रवासामुळे सनातन संस्था, सनातनचे आश्रम आणि सर्वत्रचे साधक यांचे रक्षण होते; म्हणून कार्तिकपुत्रीने दैवी प्रवास करायचा आहे. तिने अजून पुष्कळ प्रवास करायचा आहे.’ – सप्तर्षी (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक १९६ (३.२.२०२२))
आ. कार्तिकपुत्री विविध विषयांवर ओघवत्या वाणीत करत असलेले मार्गदर्शन ! : ‘कार्तिकपुत्री अधून-मधून साधनेविषयी, अध्यात्माविषयी, सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांविषयी, सप्तर्षींविषयी जे लिखाण करते, ते सर्वत्रच्या साधकांना पुष्कळ आवडते. तिचे लिखाण वाचतांना ‘ती अगदी आपल्या समोर येऊन ओघवत्या वाणीमध्ये बोलत आहे’, असे वाटते.’ – सप्तर्षी (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक १९६ (३.२.२०२२))
(‘हो, असेच आहे. अनेक साधकांना याची प्रचीती आलेली आहे.’ – संकलक)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मनातील विचार (इच्छाशक्ती) म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि ते विचार कृतीत आणणारी शक्ती (क्रियाशक्ती) म्हणजे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ होय !’ – सप्तर्षी (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक १४५ (१७.०५.२०२२)) ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ शंखचक्रधारी श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे स्वस्वरूप आहेत !’ – सप्तर्षी (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक १४५ (१७.०५.२०२२)) ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना जर सुवर्णाचे अलंकार घातले, तर त्या अलंकारातील नक्षी म्हणजे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ होय !’ – सप्तर्षी (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक १४७ (१६.०६.२०२२)) |