तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपकीर्ती केल्याचे प्रकरण
नवी देहली – तृणमूल कांग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी राजस्थानमधील जयपूर विमानतळावरून अटक केली. १ डिसेंबर २०२२ या दिवशी गुजरातमधील मोरबी येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मोदी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्या वेळी गोखले यांनी एका माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौर्यावर ३० कोटी रुपये खर्च झाल्याचे ट्विट केले होते.
TMC’s Saket Gokhale Arrested For Posting ‘False Tweet’ On The Collapse Of Morbi Bridge.https://t.co/2ETlnVUCtW
— TIMES NOW (@TimesNow) December 6, 2022
वास्तविक अशी कोणतीही माहिती माहिती अधिकारातून मागवली नव्हती, असे निष्पन्न झाले होते. पंतप्रधान मोदी यांची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. मोदी यांचे स्वागत करण्यासाठी ५ कोटी, कार्यक्रमाचे आयोजन, छायाचित्रे काढणे यांसाठी साडेपाच कोटी खर्च करण्यात आले, असा हिशोब गोखले यांनी त्यांच्या ट्विट मध्ये मांडला होता.
संपादकीय भूमिकाभारतात लोकशाही असल्यामुळे कुणी कुणावरही आरोप किंवा टीका करू शकतो; मात्र कुणी खोटे आरोप करून कुणाची अपकीर्ती करत असेल, तर त्याला शिक्षा होणे आवश्यक आहे ! |