नाशिक येथील सप्तशृंगी देवस्थानच्या व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन !
नाशिक – सप्तशृंगी देवस्थान विश्वस्त मंडळाने नोकरभरती करतांना स्थानिकांना डावलून इतरांची नियुक्ती केली आहे, तसेच त्यांना स्थानिकांच्या वेतनापेक्षा अधिक वेतन दिले आहे, असा आरोप करत स्थानिक गावकर्यांनी ५ डिसेंबर या दिवशी आंदोलन करून दुकाने बंद ठेवली. अप्पर जिल्हाधिकार्यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सप्तशृंगी देवस्थानच्या विरोधात गावकरीच एकवटले, देवस्थान आणि गावकरी यांच्यात खटके कशावरून उडतात ? जाणून घ्या…https://t.co/AW1aGeqgqy#saptshrungi #protest #trust
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2022
गेल्या काही दिवसांपूर्वी येथे सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जुने सुरक्षारक्षक देवस्थानचे आहेत. त्यांच्यापेक्षा अधिक वेतन नवीन सुरक्षारक्षकांना देण्यात आले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ‘बाहेरील गावातील लोकांची नियुक्ती करण्याऐवजी गावातील तरुणांचा विचार केला असता, तर ते अधिक योग्य झाले असते’, अशी भावना ग्रामस्थांमध्ये होती.
व्यवस्थापनाच्या संदर्भात नागरिकांच्या अन्यही अनेक तक्रारी आहेत. ‘देवस्थान व्यवस्थापन कोणत्याही कामांमध्ये स्थानिकांना विचारात घेत नाही’, ‘व्यवस्थापनाकडून वेळोवेळी मनमानी कारभार केला जातो’, अशा स्वरूपाचे आरोप नागरिक व्यवस्थापनावर करत आहेत.
संपादकीय भूमिकामंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! |