शिवरायांची वाघनखे ब्रिटनमधून आणण्यासाठी प्रयत्न करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा चालू आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५ डिसेंबर या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
(सौजन्य : ABP MAJHA)
याविषयी सविस्तर माहिती ६ डिसेंबर यादिवशी देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी लंडन येथे असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार घोषित केले आहे.