आतंकवाद असेपर्यंत पाकशी कोणतीही चर्चा नाही ! – भारताचा पुनरूच्चार !
नवी देहली – आतंकवाद चालू असेपर्यंत पाकिस्तानसमवेत कोणतीही चर्चा होऊ शकत नाहीत, असा पुनरुच्चार भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी केला. जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री एनालेना बेयरबॉक या भारताच्या २ दिवसांच्या दौर्यावर आल्या आहेत. बेयरबॉक आणि एस्. जयशंकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी वरील विधान केले.
बेयरबॉक या वेळी म्हणाल्या की, सध्याच्या जागतिक वातारणात दोन्ही देशांनी एकत्र उभे रहाण्याची आवश्यकता आहे. आम्ही यापूर्वी अनेकदा भेटलो आहोत. यातून स्पष्ट होते की, आमच्यामध्ये किती घनिष्ठ समन्वय आहे. आज जगासमोर अनेक आव्हाने आहेत. अशा वेळी आम्ही एकत्र उभे रहाणे अतिशय आवश्यक आहे.
सौजन्य : ANI News