माजलगाव (जिल्हा बीड) येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधात हिंदु संघटनांचा मूक मोर्चा !
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्याच्या मागणीचे प्रशासनाला निवेदन
माजलगाव (जिल्हा बीड), ५ डिसेंबर (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात कायद्याची कठोर कार्यवाही करण्यासाठी ४ डिसेंबर या दिवशी येथील ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातील झेंडा चौक येथून शिवाचार्य चंद्रशेखर महाराज यांच्या हस्ते मोर्च्याला प्रारंभ झाला. या मोर्च्यामध्ये राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, तसेच तालुक्यातील आधुनिक वैद्य, अधिवक्ते, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक आणि सहस्रो विद्यार्थी सहभागी झाले होते. या मोर्च्यामध्ये महिला आणि महाविद्यालयीन मुली यांचीही संख्या लक्षणीय होती.
शासकीय जागेतील अनधिकृत मजार दर्ग्याचे बांधकाम हटवण्याचीही निवेदनात मागणी !
या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ‘माजलगाव धरणाजवळील शासकीय जागेत अनधिकृत मजार दर्ग्याचे बांधकाम तात्काळ हटवावे’, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.