सरिता या हिंदु महिलेची तिचा मुसलमान पती आणि कुटुंबीय यांनी हत्या केल्याचा आरोप !
आता उत्तरप्रदेशच्या सीतापूरमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण उजेडात !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील सीतापूर जिल्ह्यात असलेल्या मछरेहटा या भागात सरिता उपाख्य सईदा या युवतीचा ३ डिसेंबर या दिवशी मृत्यू झाला. ‘हे प्रकरण लव्ह जिहादचे असून ती त्याचा बळी ठरली आहे’, असा आरोप पीडितेचे हिंदु कुटुंबीय आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओही तिच्या वडिलांनी प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये वडील म्हणत आहेत, ‘माझ्या मुलीचा तिचा पती युनूस आणि त्याचे कुटुंबीय यांनी हत्या केली.’ त्यांनी पोलिसांत तशी तक्रारही प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी मात्र सरिताचा मृत्यू हा मानसिक आजारामुळे झाल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत या प्रकरणी कोणताच गुन्हा नोंद करण्यात आला नसून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
यूनुस के लिए सरिता से सईदा बनी हिन्दू लड़की… 2 साल बाद मौत: परिवार ने जताई हत्या की आशंका, हिंदू संगठनों का विरोध; पुलिस ने आरोप नकारे#Uttarpradesh #Sitapur #Hindugirl #ReligiousConversionhttps://t.co/Oj26aQEMAY
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 4, 2022
सरिताच्या वडिलांनी आरोप केला की, २ वर्षांपूर्वी सरिताला काहीतरी खायला घालून युनूस याने तिचे अपहरण केले. त्याने सरिताचे अश्लील व्हिडिओही बनवले होते. त्याद्वारे तो तिला धमकावत होता. त्याने तिच्याशी विवाह केला. तसेच पुढे तिला गर्भपात करण्यासही भाग पाडले.
संपादकीय भूमिकाया आरोपांमध्ये तथ्य असल्यास हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादच्या विरोधात आता नुसता कायदा करून उपयोग नाही, तर त्याच्या पुढे जाऊन त्याविरोधात कठोर उपाययोजना करणे अनिवार्य आहे, असेच हिंदु जनतेला प्रकर्षाने वाटते ! |