९६ दिवसांपासून कतारच्या कारागृहात बंद आहेत भारतीय नौदलाचे ८ माजी सैनिक !
दोहा (कतार) – गेल्या ९६ दिवसांपासून भारतीय नौदलाच्या ८ माजी सैनिकांना कतारने कारागृहात टाकले आहे. भारत सरकारकडून विविध प्रयत्न करूनही कतार त्यांची सुटका करण्यास सिद्ध नाही. आता या माजी सैनिकांना स्थानिक न्यायालयाने आणखी १ मास कारागृहात ठेवण्याचा आदेश दिला आहे. ‘या माजी सैनिकांना कोणत्या आरोपाच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे’, हेही कतारने स्पष्ट केलेले नाही. ३० ऑगस्टला या ८ जणांना कतारने अटक केली होती. हे सर्वजण सेवानिवृत्तीनंतर कतारच्या एका खासगी आस्थापनामध्ये नोकरी करत होते.
संपादकीय भूमिकाजिहादी इस्लामी देश कतारच्या कह्यातून भारताच्या माजी सैनिकांना बाहेर काढण्यात सरकारला काय अडचण आहे, हे त्याने जनतेला सांगितले पाहिजे ! |