‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भगिनींना साहाय्य करण्यासाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल ‘हेल्पलाईन’सह अहोरात्र सज्ज ! – शंकर गायकर, विभागीय संघटक
कोल्हापूर – ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भगिनींना साहाय्य करण्यासाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल ‘हेल्पलाईन’सह अहोरात्र सज्ज आहे. कुणालाही साहाय्य हवे असल्यास ८७६६५२५८५७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र-गोवा क्षेत्रीय संघटक श्री. शंकर गायकर यांनी केले. महाद्वार रोड येथील डॉक्टर हेगडेवार चौकातील विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या ‘हेल्पलाईन’च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
प्रांरभी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर जोशी-वंदुरकर यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी आरोग्य समन्वयक श्री. राजेंद्र मकोटे, सर्वश्री सुनील पाटील, महेश उरसाल, सागर ठाणेकर यांसह अन्य उपस्थित होते. भविष्यात अशा शाखा प्रत्येक प्रभागनिहाय चालू करण्यात येणार असून त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन अधिवक्ता सुधीर जोशी-वंदुरकर यांनी केले आहे.