हाडांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी प्रतिदिन अंगावर ऊन घ्या !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १०६
‘आजकाल हाडांची घनता मोजण्याची चाचणी (बोन मिनरल डेंसिटी टेस्ट) केल्यास बहुसंख्य लोकांमध्ये हाडांची घनता न्यून असल्याचे लक्षात येते. याचे एक मुख्य कारण म्हणजे पालटत्या जीवनशैलीमुळे अंगावर ऊन न पडणे. उन्हाचा (सूर्यप्रकाशाचा) त्वचेशी थेट संपर्क आल्याने शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण होते. ‘ड’ जीवनसत्त्व हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येकानेच प्रतिदिन सकाळी ९.३० वाजण्याच्या पूर्वी किंवा दुपारी ४.३० वाजल्यानंतर न्यूनतम १५ मिनिटे कोवळ्या उन्हात बसावे. ज्यांना बसणे शक्य नाही, त्यांनी आडवे पडूनही उन्हाचे उपाय केल्यास चालते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२२)