राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त अधिकच्या ५५ गाड्यांचे नियोजन !
कोल्हापूर, ४ डिसेंबर (वार्ता.) – राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने दत्तजयंतीच्या निमित्ताने भाविकांसाठी अधिकच्या ५५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात नृसिंहवाडी-सांगली, नृसिंहवाडी-हुपरी, नृसिंहवाडी-कोल्हापूर, इचलकरंजी यांचा समावेश आहे. या गाड्या पहाटे ५ वाजल्यापासून चालू होतील. नियमित असणार्या कुरुंदवाड-पणजी, पुणे, नाशिक, मुंबई या गाड्याही दत्तजयंतीनिमित्त उपलब्ध आहेत, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आली.