दिघा (नवी मुंबई) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह ५ जणांवर गुन्हा नोंद
नवी मुंबई – दिघा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नवीन गवते यांच्यासह पाच जणांवर फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार अभंग शिंदे यांना माजी नगरसेवक नवीन गवते आणि त्यांचे साथीदार यांनी किरकोळ शिवीगाळ करत दमदाटी केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अर्ज देऊनही कारवाई होत नसल्याने शिंदे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाने रबाळे एम्.आय.डी.सी. पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर गुन्हा नोंद करण्यात आला.