‘हर हर महादेव’ हा चित्रपट ‘झी स्टुडिओ’वर प्रदर्शित करू नये ! – छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार
पुणे – गेल्या काही दिवसांपासून ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून वाद चालू आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडण्यात आले होते. हा चित्रपट आता दूरदर्शनवर प्रदर्शित होत असल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ‘जर हा चित्रपट दूरदर्शनवर प्रदर्शित झाला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी त्यांनी ‘झी स्टुडिओ’ला एका पत्राद्वारे दिली आहे. ट्वीट करत त्यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल.
हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. pic.twitter.com/UUAyOKyF72
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 3, 2022
‘हर हर महादेव’ या चित्रपटामध्ये छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण केले आहे. शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट दूरदर्शनवर प्रदर्शित करू नये, असे पत्र ‘स्वराज्य’ संघटनेने ‘झी स्टुडिओ’ला दिले आहे.
सौजन्य : ABP MAJHA