(म्हणे) ‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांनी संघटित होऊन त्यांचे प्रतिनिधित्व करणार्याला निवडावे !’
-
कर्णावती येथील जामा मशिदीच्या इमामाचे आवाहन
-
एम्.आय.एम्.ने काँग्रेसशी शत्रूत्व न घेण्याचेही आवाहन !
कर्णावती (गुजरात) – येथील जामा मशिदेचे शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी येथील जमालपुरा या मुसलमानबहुल विधानसभा मतदारसंघातील मुसलमानांना संघटित होऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मागील निवडणुकीत येथे भाजपचा उमेदवार निवडून आल्याने शाही इमामाने मुसलमानांचे प्रतिनिधित्व करणार्याला निवडून आणण्याचे आवाहन केले. येथे भाजपकडून भूषण मित्तल हे निवडणूक लढवत आहेत.
‘गुजरात के सभी मुस्लिम एकजुट होकर कॉन्ग्रेस के लिए करें वोट’: जामा मस्जिद के शाही इमाम ने जारी किया ‘फतवा’, कहा – राज्य में तीसरी पार्टी के लिए जगह नहीं#JamaMasjid #GujaratElections2022https://t.co/yI9G95zze4
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 4, 2022
१. गुजरातमध्ये एम्.आय.एम्.ही निवडणूक लढवत आहे. याविषयी इमाम शब्बीर म्हणाले की, मुसलमानांचे भाजपशी शत्रूत्व आहे, तर अशा वेळी त्याने काँग्रेसशी शत्रूत्व बाळगू नये.(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारी व्यक्ती )
२. याविषयी भूषण मित्तल म्हणाले की, मुसलमानांना लक्षात आले आहे की, काँग्रेस केवळ मतपेढी म्हणून त्यांचा वापर करत आहे. अशा वेळी काँग्रेसला तिची मतपेढी वाचवण्यासाठी अल्प पर्याय शिल्लक राहिले आहेत.
संपादकीय भूमिका‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांचे प्रतिनिधित्व हिंदु करू शकत नाहीत का ?’, असा प्रश्न निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी इमामांना विचारतील का ? |