नागपूर येथे शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी २६ डिसेंबरला विधानभवनावर भव्य मोर्चा !
नागपूर – येथे १९ डिसेंबरपासून चालू होणार्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘राज्य किसान सभे’च्या वतीने २६ डिसेंबर या दिवशी येथील विधानभवनावर शेतकर्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात शेतकरी आणि शेतमजूर यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य किसान सभेचे नेते राजन क्षीरसागर यांनी ४ डिसेंबर या दिवशी येथे केले.
या वेळी वणी ते नागपूर अशी पदयात्रा करत शेतकर्यांची ‘संघर्ष दिंडी’ काढण्यात येणार आहे. शेतकर्यांचे संपूर्ण वीजदेयक माफ करण्यात यावे, वन्य पशूंमुळे होणारी मनुष्यहानी आणि पीकहानी बंद करावी, घरकुलासाठी वाढीव अनुदान अन् शेतकर्यांना भूमीचा हक्क द्यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.