पुणे येथे केंद्रीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्या अल्पवयीन तरुणीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या !
तरुणींनो, त्रास देणार्यांना कंटाळून आत्महत्या न करता साधना करून मनोबल वाढवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन त्रास देणार्यांनाच सळो की पळो करून सोडा !
पुणे – येथील चंदननगर परिसरातील केंद्रीय महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेणार्या १७ वर्षीय तरुणीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तिच्याच वर्गात शिक्षण घेणारा एक तरुण जुलैपासून सातत्याने तिचा पाठलाग करत होता. मैत्री करावी म्हणून बळजोरी करत होता. याला कंटाळून तिने ऑक्टोबरमध्ये रहात्या घरात गळफास घेतला. आरंभीला या प्रकरणी अकस्मात् मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला होता; मात्र अन्वेषणातून आरोपीने तिला कशा प्रकारे त्रास दिला, हे सर्व समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. विमानतळ पोलीस या संपूर्ण प्रकरणाचे अधिक अन्वेषण करत आहेत.