नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्यापूर्वी विमानतळाच्या परिसरात कर्नाटक सरकारचे फलक !
नागपूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४ डिसेंबर या दिवशी येथे समृद्धी महामार्गाची पहाणी करण्यासाठी येणार होते. येथील बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन होणार होते. त्यानंतर ते समृद्धी महामार्गाच्या पहाणीसाठी जाणार होते. त्यापूर्वी नागपूर विमानतळाबाहेरील रस्त्यांवर कर्नाटक सरकारचे फलक लावण्यात आले होते. कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक हे फलक लावण्यात आले आहेत का ?, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील काही गावांवर कर्नाटक सरकारने दावे केले आहेत. त्यानंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. ‘चला कर्नाटक पाहूया’, अशा आशयाचा संदेश या फलकांवर असून कर्नाटकमधील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांची छायाचित्रे या फलकांवर आहेत. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई आणि पर्यटनमंत्री आनंद सिंह यांची छायाचित्रेही या फलकांवर आाहेत.