सातारा येथे १० सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांचा लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या विरोधी जन आक्रोश मोर्चा !
धर्मांतर आणि गोहत्या बंदी झालीच पाहिजे ! – सौ. मेघा कदम, हिंदुत्वनिष्ठ
सातारा, ४ डिसेंबर (वार्ता.) – येथे ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने गांधी मैदान ते शिवतीर्थ असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून १० सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते. या वेळी ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, ‘भारतमाता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’, या घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला.
प्रारंभी संतांच्या वंदनीय उपस्थितीत परमपवित्र भगवा ध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले. या वेळी शंखनाद करण्यात आला.
सोळशी येथील मठपती पू. नंदगिरी महाराज यांनी मोर्च्याला आशीर्वादरूपी पाठिंबा दर्शवला. नंतर मोर्च्याला प्रारंभ झाला. राजवाडा गांधी मैदान, मोती चौक, पंचमुखी गणपति मंदिर, ५०१ पाटी, पोलीस मुख्यालय मार्गे शिवतीर्थ, पुढे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. या वेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सौ. गीतांजली गोंधळेकर यांनी केले.
धर्मांतर आणि गोहत्या बंदी झालीच पाहिजे ! – मेघाताई कदम, हिंदुत्वनिष्ठ
प्रतिदिन हिंदु माता-भगिनींवर प्रेमसंबंधातून हत्या होत आहेत. हिंदु मुलींना प्रेमप्रकरणात फसवून त्यांचे बळजोरीने धर्मांतर करण्याच्या अनेक घटना घडत आहेत. गोमाताही प्रतिदिन पशूवधगृहात कापली जात आहे. हे हिंदूंच्या अस्तित्वावरील थेट आक्रमण आहे. हिंदु माता-भगिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना विरोध करणारे कठोर कायदे करून त्यांनी कार्यवाही झाली पाहिजे.
‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा बनवून त्याची कडक कार्यवाही व्हावी ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समती
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे म्हणाल्या की, हिंदु वंशविच्छेदासाठी आतापर्यंत तलवारीच्या जोरावर धर्मयुद्धे झाली, आता जनसंख्येच्या आधारे युद्धे होत आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे हे होत आहे. हिंदु माता-भगिनींना धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण आवश्यक आहे. लव्ह जिहादविरोधी कायद्याची कडक कार्यवाही झाली, तरच पुन्हा या देशात ‘श्रद्धा’सारखी प्रकरणे घडणार नाहीत.
मोर्च्यानंतर ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
निवेदन देतांना उपस्थित असलेले मान्यवर
समर्थभक्त पू. शहाजीबुवा रामदासी, हिंदु एकता आंदोलनचे विक्रम पावसकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंदराव आफळे, गणेश मेळावणे, डॉ. गद्रे, हिंदु महासभेचे दत्ताजी सणस, उमेश गांधी, धनराज जगताप, हिंदु जागरण मंचचे विक्रम जगदाळे, धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सतीश ओतारी, ओंकार डोंगरे, सागर आमले, संकेत शिंदे, गणेश पवार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पराग कुलकर्णी, विश्व हिंदु परिषदेचे जितेंद्र वाडेकर, श्री. ताथवडेर, इस्कॉनचे प्रवीण रसाळ, सनातन संस्थेच्या सौ. विद्या कदम, सौ. संतोषी माने, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, सौ. रूपा महाडिक, सातारा-जावळीचे भाजपचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे, कोरेगावचे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेश शिंदे, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राहुल पवार, माजी नगरसेवक विजयकुमार काटवटे, विकास गोसावी, धनंजय जांभळे, सिद्धी पवार आदी उपस्थित होते.
राजवाडा येथील शिव-समर्थ शिल्पाला विशेष पोलीस संरक्षण !
सातारा, राजवाडा बसस्थानकामध्ये उभारण्यात आलेल्या शिवसमर्थ शिल्पाला पोलिसांकडून विशेष संरक्षण देण्यात आले होते. याठिकाणी कोणताही वाद उत्पन्न होऊ नये, यासाठी जलद कृती दलाची विशेष तुकडी तैनात करण्यात आली होती.