बंगालमध्ये भाजपच्या सभेमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार
दक्षिण २४ परगणा (बंगाल) – येथे ३ डिसेंबर या दिवशी भाजपच्या सभेमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार केला. यात त्यांनी दगडफेक केली, तसेच अनेक दुचाकी वाहनांची जाळपोळ केली. भाजपचे नेते आणि आमदार शुभेंदु अधिकारी या सभेला मार्गदर्शन करणार होते.
Bengal: Stones Hurled, Bikes Set On Fire As Violent Clash Breaks Out Between BJP And TMC Workershttps://t.co/q5rlRocFUI
— ABP LIVE (@abplive) December 3, 2022
शुभेंदु अधिकारी यांनी माहिती देतांना सांगितले की, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी १०० हून अधिक गाड्यांची तोडफोड केली, तसेच १५० हून महिलांवर आक्रमण केले. यात ५० महिला गंभीररित्या घायाळ झाल्या, तर एक महिला बेपत्ता झाली आहे. या सभेला ममता बॅनर्जी सरकारच्या प्रशासनाने अनुमती दिली नव्हती. न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने अनुमती दिली होती. पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या काही जणांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकातृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये सातत्याने भाजपला लक्ष्य केले जात असतांना केंद्रातील भाजप सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य ठरील, असेच जनतेला वाटते ! |