जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदी सर्वांना एकत्रित करतील !
भारताने जी-२० परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यावरून फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांचे ट्वीट !
पॅरिस (फ्रान्स) – एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ! भारताने जी-२० परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. मी माझे मित्र नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास करतो की, ते आम्हाला जगात शांतता आणि सशक्त बनवण्यासाठी एकत्र आणतील, असे ट्वीट करत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वतः एकत्र असलेले एक छायाचित्र पोस्ट केले आहे. १ डिसेंबर या दिवशी भारताने ‘जी-२०’ परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. पुढील वर्षी ९ आणि १० डिसेंबर या दिवशी भारत या परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे.
“One Earth. One Family. One Future. India has taken over the presidency of #G20India! I trust my friend #NarendraModi to bring us together in order to build peace and a more sustainable world,” French President Emmanuel Macron wrote.https://t.co/N6VeWA6OKJ
— Hindustan Times (@htTweets) December 4, 2022