(म्हणे) ‘युद्ध झाल्यास पूर्ण शक्तीनीशी सामना करू !’
पाकच्या नव्या सैन्यदलप्रमुखांची दर्पोक्ती !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – मी हे स्पष्ट करू इच्छितो की, पाकिस्तानी सैन्य स्वतःच्या भूभागाच्या प्रत्येक इंचाचे संरक्षण करण्यासाठी नेहमीच सिद्ध आहे. आमच्यावर युद्ध लादल्यास शत्रूला पराभूत करण्याची क्षमताही आमच्यात आहे. कोणत्याही दुःसाहसाचा पाकिस्तानच्या वतीने पूर्ण शक्तीनीशी सामना केला जाईल, अशी दर्पोक्ती पाकचे नवे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी केले. असीम मुनीर यांनी ३ डिसेंबर या दिवशी भारताला लागून असलेल्या नियंत्रणरेषेला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी नियंत्रणरेषेला लागून असलेल्या चौक्यांची पहाणी केली.
“Pakistan’s armed forces are ever ready, not only to defend every inch of our motherland, but to take the fight back to the enemy, if ever, war is imposed on us.”
– COAS General Asim Munir, during his visit to the LoC pic.twitter.com/IU2gkVYBG1— PTV News (@PTVNewsOfficial) December 4, 2022
यानंतर पाकिस्तानी सैनिकांना संबोधित करतांना जनरल असीम मुनीर पुढे म्हणाले की, भारताने गिलगिट, बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्याविषयी केलेले वक्तव्य दायित्वशून्यतेचे आहे.’ भारताने नुकतेच ‘पाकव्याक्त काश्मीर परत घेऊ’, असे म्हटले होते.
संपादकीय भूमिकागेल्या ७५ वर्षांत पाकने भारताशी केलेल्या चारही युद्धात सपाटून मार खाल्ला आहे. पाकचे २ तुकडेही झाले आहेत. तरीही पाकची खुमखुमी संपलेली नाही. पाकचा संपूर्ण नायनाट जोपर्यंत केला जात नाही, तोपर्यंत हे असेच चालणार ! |