लोकलमध्ये महिलेचे छायाचित्र काढणार्या धर्मांधाला अटक !
नवी मुंबई – नेरूळ ते वडाळा लोकलगाडीने प्रवास करतांना महिलेचे छायाचित्र काढणार्या धर्मांधाला प्रवाशांनी चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. या प्रकरणी वाशी लोहमार्ग पोलिसांनी फरीद असगर अली अन्सारी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. पीडित महिला कुटुंबियांसह मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास नेरूळ ते वडाळा लोकलगाडीने प्रवास करत होती. या वेळी फरीदने त्याच्या भ्रमणभाषवरून पीडित महिलेचे छायाचित्र काढले. ही गोष्ट महिलेच्या भावाने पाहिल्यानंतर त्याने त्याला खडसावले. त्यावर त्याने अरेरावी करत छायाचित्र काढल्याचे सांगितले. हा प्रकार पाहून लोकलमध्ये असलेल्या इतर प्रवाशांनी फरीदला पकडून पुष्कळ मारहाण केली. त्यानंतर वडाळा रेल्वेस्थानकात उतरवून त्याला रेल्वे पोलिसांच्या कह्यात दिले.
संपादकीय भूमिकापोलीस आणि कायदा यांचे भयच नसलेले धर्मांध ! |