कृष्णनीती वापरूनच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
५ सहस्र हिंदूंची उपस्थिती
रत्नागिरी, ३ डिसेंबर (वार्ता.) – ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ हा विचार सोडून ‘मी प्रयत्न करीन, मगच देव माझ्या मागे उभा राहील’, हे लक्षात घेऊन हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत. अत्याचारांच्या विरोधात स्वतः आवाज उठवा, कुणासाठीही थांबू नका. अधर्माच्या नाशासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेईलच; परंतु त्यासाठी स्वतः धर्मावरील आघातांच्या विरोधात उभे रहा. महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन करून धर्माच्या रक्षणासाठी त्याच्याकडून कृष्णनीतीनुसार आचरण करून घेतले, त्याचप्रमाणे आपण धर्मरक्षणासाठी कृष्णनीतीनुसार कृती करावी लागेल. अर्जुनाप्रमाणे कृष्णनीती वापरूनच रामराज्य म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करू शकतो, असे प्रतिपादन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शनिवार, ३ डिसेंबर २०२२ या दिवशी शहरातील मारुति मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते.
प्रारंभी श्री. ज्ञानदेव पाटील यांनी शंखनाद केला. सद्गुरु स्वाती खाडये, श्री. रणजित सावरकर आणि श्री. मनोज खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला श्री. मनोज खाडये यांनी पुष्पहार घातला. त्यानंतर वेदमंत्रपठण वेदमूर्ती केतन शहाणे, अवधूत मुळ्ये आणि रविशंकर पंडित यांनी केले. या ब्रह्मवृंदांचा सत्कार समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी केला. समितीच्या कार्याचा परिचय समितीचे जिल्हा समन्वयक श्री. विनोद गादीकर यांनी सांगितला. या सभेचे सूत्रसंचालन श्री. आनंद मोंडकर आणि कु. नारायणी शहाणे यांनी केले.
संत सन्मानया सभेला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, पू. चंद्रसेन मयेकर यांचा सन्मान सनातन संस्थेचे रत्नागिरी जिल्हासेवक श्री. महेंद्र चाळके यांनी केला. पू. रत्नमाला दळवी यांचा सन्मान सनातनच्या साधिका सौ. सुषमा सनगरे यांनी केला. |
या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये उपस्थित होते. या सभेला रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागांतून ५ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी सत्कार
|
श्री. रणजित सावरकर पुढे म्हणाले की,
१. हिंदूंनी प्रत्येक आघात पचवला. ‘धर्माला शस्त्राचे बळ नसेल, तर धर्म पांगळा होतो’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते. ते खरे ठरले. वर्ष १९२१ मध्ये हिंदूंची मंदिरे पाडून गायींना कापून त्यांचे अवयवही मंदिरात बांधले गेले होते. तेव्हा म. गांधी शांत राहिले. वर्ष १९१९ मध्ये जालियनवाला बाग आंदोलनाच्या दुसर्या दिवशी म. गांधी यांनी हिंदूंनी ब्रिटीश मुलांची माथी भडकावली; म्हणून ब्रिटिशांची क्षमा मागितली. त्यामुळे हिंदु धर्मावर आघात होत राहिले. मोहनदास गांधी यांच्यासारख्या चुका टाळणे आवश्यक आहे. या चुका टाळण्यासाठी हिंदूंनी संघटित झालेच पाहिजे. सावरकर अंदमानात असतांना भारतात मुसलमानांनी खिलाफत चळवळ चालू झाली. तेव्हाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘ही राष्ट्रावर आलेली आफत आहे’, असे म्हटले होते. त्यांनी धोका आधीच ओळखला होता. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करतांना इतिहासाचा अभ्यास करावा लागेल. हिंदू त्यांची सद्गुण विकृती टाळत नाही, तोपर्यंत हिंदु समाज पुढे जाणार नाही. आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करणार्या शिवरायांचा आदर्श घ्यावा लागेल.
२. भारतामध्ये निर्माण झालेला सनातन हिंदु धर्म, तसेच जैन, बौद्ध इत्यादी कोणताही पंथ द्वेष करायला शिकवत नाहीत. सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे भारतातील हिंदूंनी जात-पात विसरून एक व्हायला पाहिजे. हिंदूंचे एवढे मोठे संघटन निर्माण झाले पाहिजे की, आफताब निर्माण व्हायलाच नकोत. खरे तर हे शासनाचे कर्तव्य आहे; परंतु शासनाने ते केले नाही, तर हिंदूंनी सतर्क राहून दबाव निर्माण केला पाहिजे.
३. २०२४ च्या निवडणुकीत ‘जो हिंदु हिताविषयी बोलेल, तोच देशावर राज्य करेल’, हा आवाज शासनकर्त्यांपर्यंत पोचला पाहिजे.
अँड्राइड सनातन पंचांग २०२३ चे लोकार्पण‘सनातन पंचांग’चे लोकार्पण करतांना डावीकडून सद्गुरु स्वाती खाडये, श्री. रणजित सावरकर आणि मनोज खाडये |
सभेतील अन्य वक्त्यांचे मार्गदर्शन
साधना करून संघटित झालो, तर वर्ष २०२५ च्या आधीच हिंदु राष्ट्र येईल ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सध्याच्या धर्मनिरपेक्ष व्यवस्थेतच हिंदुत्वासाठी असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू संघटित नसल्याने कुणीही उठून हिंदूंच्या प्रथा-परंपरांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यापुढे जो आदर्श उभा केला, त्याचे आचरण करून आध्यात्मिक अधिष्ठान ठेवले म्हणजे साधना करून संघटित झालो, तर भगवान श्रीकृष्ण वर्ष २०२५ च्या आधीच हिंदु राष्ट्र उभारेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढणारे हात जेवढे महत्त्वाचे होते, तेवढेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी देवाला प्रार्थना करणारे हातही महत्त्वाचे होते’, असे म्हटले होते. यातून चळवळीमागे आध्यात्मिक अधिष्ठान महत्त्वाचे आहे. संत आणि भविष्यवेत्ते यांनी सांगितलेल्या आगामी भीषण आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी साधना करा.
हिंदूंपुढे ‘इस्लामी राष्ट्र’ कि ‘हिंदु राष्ट्र’ हा प्रश्न ! – मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
केरळ उच्च न्यायालयानेही ‘लव्ह जिहाद’ मुळे २ सहस्रांहून अधिक मुली गायब असल्याचे म्हटले होते. आता आपल्या कुटुंबातील मुलगी ‘श्रद्धा’ होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’ असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार प्रत्यक्षात उतरतांना दिसत आहेत. आम्हा हिंदूंना शिकवले जाते की, हिंदू-मुसलमान भाई-भाई म्हणा. त्यांना मी सांगत आहे, ‘जोपर्यंत गोमातेला चिरून खाणारे तिला ‘गोमाता’ म्हणत नाहीत, तोपर्यंत ‘आम्ही धर्मांधांना ‘भाई’ म्हणणार नाही’, असे ठरवा. छत्रपतींनी संपवलेली मोगलाई गड-दुर्गांवरील धर्मांधांच्या अतिक्रमणांच्या रूपात पुन्हा येत आहे. हिंदूंच्या पुढे लव्ह जिहाद, हलाल जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर या समस्या आहेत. त्यामुळे आता ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ कि ‘हिंदु राष्ट्र’ हा नाही, तर ‘इस्लामी राष्ट्र’ कि ‘हिंदु राष्ट्र’ हा प्रश्न हिंदूंपुढे आहे.
♦ सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु कु. स्वाती खाडये यांचा सन्मान रत्नागिरीतील जिज्ञासू सौ. रचना राऊत यांनी केला. ♦ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी केला. ♦ हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांचा सत्कार गोसेवा संघाचे उपाध्यक्ष आणि हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. चंद्रकांत राऊळ यांनी केला. |
भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगतांना सनातनचे बालसाधक
जिजामाता : कु. मैथिली गावडे
राणी चेन्नम्मा : कु. ईश्वरी गुळेकर
स्वातंत्र्यवीर सावरकर : कु. चैतन्य खेराडे
सूत्रसंचालन : कु. वैदेही कदम
शिरीषकुमार : कु. साईराज घडशी
झाशीची राणी : कु. सृष्टी धनावडे
सुभाषचंद्र बोस : कु. संभव धनावडे
वैशिष्ट्यपूर्ण
♦ सभेत झाली स्वसंरक्षण प्रात्यक्षिके
सभेत स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यामध्ये श्री. प्रकाश कोंडस्कर, श्री. महेश लाड, कु. मृण्मयी कात्रे आणि कु. श्रुति मांडवकर यांनी सहभाग घेतला. या प्रात्यक्षिकांच्या वेळी सभेतून टाळ्या वाजवून प्रतिसाद मिळाला.
♦ एक जानेवारी पाश्चात्त्य नववर्षाला साजरे न करता, गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करा, या सर्वांनी भ्रमणभाषच्या विजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
♦ श्री. मनोज खाडये यांनी भाषणाच्या वेळी ‘भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडवा हा नववर्षारंभ आहे. पाश्चात्त्य संस्कृतीनुसार नववर्षारंभ १ जानेवारीला साजरे न करता गुढीपाडव्याला साजरे करणार ना ?’, असे विचारल्यावर सभेला आलेल्या शेकडो धर्मप्रेमींनी हात उंचावून त्यांच्या भ्रमणभाषची विजेरी (टॉर्च) पेटवून प्रतिसाद दिला
♦ क्रांतीकारकांचा वेश परिधान करून बालसाधकांनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगून प्रबोधन केले.
♦ लांजा तालुका वारकरी संप्रदायाचे वारकरी दिंडी घेऊन सहभागी झाले.
♦ लांजा येथील बजरंग दलाचे १०० कार्यकर्ते आणि रत्नागिरी येथील हिंदुत्वनिष्ठ मिरवणूक काढून सभास्थळी आले.
♦ ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे १ सहस्र ९०० जणांनी सभा पाहिली !
या सभेचे ‘फेसबूक लाईव्ह’वरून प्रसारण करण्यात आले होते. ‘फेसबूक लाईव्ह’वर १ सहस्र ९०० जणांनी ही सभा पाहिली. ३८८ जणांनी आवडले, १६९ जणांनी टिपणी (कमेंट) दिली, तर २१२ जणांनी इतरांना ‘शेअर’ केली.
________________________________
आभार
श्री मरुधर विष्णु समाज रत्नागिरीचे श्री दीपक सिंह देवल आणि श्री रवींद्र सिंह राणावत ‘आम्ही फक्त शिवभक्त’ संघटनेचे सर्वश्री किरण जाधव आणि ऋषिकेश पाष्टे शिरगाव येथील श्री. चंदन खेराडे, श्री रत्नागिरी येथील विजय शिर्के डफळ चोळवाडी, खेडशी येथील श्री मंगेश घाणेकर जायंट्स ग्रुप रत्नागिरी पोलीस आणि प्रशासन, ज्ञात अज्ञात यांचे हिंदु जनजागृती समितीकडून आभार मानण्यात आले.