नगर येथील ख्रिस्ती शाळेत शीख विद्यार्थ्याला धर्मांतरासाठी दबाव टाकणार्या शाळेच्या उपमुख्याध्यापकांना अटक !
|
नगर – राहुरीतील ‘डी पॉल इंग्लीश मिडियम स्कूल’मधील नववीत शिकणार्या हरदिलसिंह सोदी या शीख विद्यार्थ्याला ख्रिस्ती धर्मात येण्यासाठी धमकवणारे शाळेचे उपमुख्याध्यापक फादर जेम्स यांच्यावर गुन्हा नोंद होऊन त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी विद्यार्थी आणि कुटुंबातील व्यक्तींनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी शीख समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी सर्वच शाळांना सूचना करण्याची मागणी केली आहे. या वेळी हरजितसिंह वधया, प्रितपालसिंह धुप्पड, अजय पंजाबी उपस्थित होते. या प्रकरणातून जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी हे प्रकरण तात्काळ जलदगती न्यायालयात चालवून कुटुंबियांना न्याय देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.