धर्मांतर केल्यानंतर पूर्वीच्या धर्मातील जातीचा वापर करता येणार नाही !
मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
चेन्नई (तमिळनाडू) – एखादी व्यक्ती एखाद्या जातीमध्ये जन्माला आल्यानंतर ती पुढे जाऊन धर्मांतर करते, तेव्हा तिची पूर्वीची जातीची ओळख रहात नाही. ती व्यक्ती त्या जातीचा वापर करू शकत नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीवर दिला. इस्लाम स्वीकारणार्याने या संदर्भात याचिका प्रविष्ट केली होती. त्याने त्याच्या कुटुंबासमवेत वर्ष २००८ मध्ये धर्मांतर केले होते. ‘जर ती व्यक्ती पुन्हा आधीच्या धर्मात परत आली, तर तिची जात कायम राहू शकते’, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
Madras HC rejects ‘backward quota’ claim of man who converted to Islam, had missed merit list after being treated as ‘general category’: Detailshttps://t.co/Z19yeZshaz
— OpIndia.com (@OpIndia_com) December 3, 2022
संपादकीय भूमिकाहे अनेकदा न्यायालयांनी स्पष्ट केलेले असतांनाही या संदर्भात परत परत याचिका प्रविष्ट केली जाते. या संदर्भात आता न्यायालयांनी कठोर आदेश देऊन यावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच कायदाप्रेमी जनतेला वाटते ! |