उत्तरप्रदेशमध्ये वेगवेगळ्या घटनांत २ साधूंच्या हत्या !
ज्यात गेल्या २ वर्षांत झाल्या २० हून अधिक साधूंच्या हत्या !
अलीगड (उत्तरप्रदेश)- उत्तरप्रदेशात दोघा साधूंच्या हत्यांच्या घटना घडल्या आहेत. अलीगड येथील नगला गावात ७० वर्षीय साधू बुद्धसेन यांची ते रात्री झोपलेले असतांना अज्ञातांकडून दगड-विटांद्वारे ठेचून हत्या करण्यात आली. गेल्या ७ वर्षांपासून ते येथे रहात होते. या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दुसर्या घटनेत बरेला भागातील परोरा गावात साधू कुंवरपाल यांची हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह येथील शेतात सापडला. या हत्येविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही.
पश्चिमी UP में दो बुजुर्ग साधुओं की हत्या: अलीगढ़ में ट्यूबवेल पर सोने गए 70 साल के पुजारी को ईंट-पत्थर से कूचकर मारा गया, पिछले 6 महीने में 8 का मर्डर#Aligarh #Sadhu #Murderhttps://t.co/kOIUnKyO7c
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 3, 2022
उत्तरप्रदेशमध्ये गेल्या २ वर्षांत २० हून अधिक साधूंच्या हत्या झालेल्या आहेत. एकट्या पश्चिम उत्तरप्रदेशमध्ये गेल्या ६ मासांमध्ये ८ साधूंच्या हत्या करण्यात आल्या आहेत. या घटनांमुळे साधू समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांना साधूंच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यामागे मोठे षड्यंत्र आहे का ?, याचा शोध राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घ्यायला हवा, असेच हिंदूंना वाटते ! |