हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव धर्मांधाला अटक
इंदूर (मध्यप्रदेश) – येथे अन्वर खान याने स्वतः हिंदु असल्याचे भासवून एका हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर संधी साधून त्याने तिच्यावर बलात्कार करून नंतर धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. या प्रकरणी पोलिसांनी अन्वरला अटक केली आहे.
हथियार लेकर घूम रहा था लव जिहाद का आरोपी: छात्रा के घर के चक्कर लगाए, मंगेतर को भी दी धमकीhttps://t.co/NSf8lyFqrS#madhyapradesh #indore #marriage pic.twitter.com/r95akieoZx
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) December 3, 2022
प्रसारमाध्यमाने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, पीडित विद्यार्थिनीची ८ वर्षांपूर्वी अन्वर खान याच्याशी सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून मैत्री झाली. अन्वर खानने स्वतःचे अन्नू असे नाव मुलीला सांगितले होते. संपर्कात आल्यानंतर दोघांची जवळीक वाढली. अन्नूचे खरे नाव अन्वर खान असल्याचे समजल्यानंतर पीडितेने त्याच्याशी मैत्री तोडली. तिने त्याच्याशी बोलणे बंद केले; परंतु अन्वर थांबला नाही. मुलीचे लग्न ठरल्याची माहिती मिळताच तो तिला धमकावू लागला. विद्यार्थिनीच्या घरी जाऊन त्याने विवाह मोडण्याची धमकी दिली. यासह इस्लाम पंथ स्वीकारून त्याच्याशी विवाह करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. याच कालावधीत अन्वर खानने विद्यार्थिनीवर बलात्कारही केला.
पीडित मुलीने अन्वरच्या कुकृत्याविषयी कुटुंबियांना माहिती दिली. यानंतर नातेवाइकांनी आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आणि हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधून साहाय्य मागितले.
संपादकीय भूमिका
|