मुंबई येथे ‘झेप्टो’च्या मुसलमान ‘डिलिव्हरी बॉय’कडून युवतीचा विनयभंग !
मुंबई – खार येथील एका युवतीने ‘झेप्टो’ या संकेतस्थळावरून ऑनलाईन मागवलेले साहित्य घेऊन आलेल्या शाहजाद शेख याने युवतीचा विनयभंग केला. युवतीने याविषयी मुंबई पोलिसांकडे ‘ट्वीट’द्वारे तक्रार केली आहे. ‘शबीना’ या ट्विटर हँडलवरून या युवतीने ही तक्रार केली आहे.
Mumbai: Delivery boy Shahzade Shaikh molests a girl, arrested after victim shares her ordeal on Instagramhttps://t.co/5qgdncaES3
— OpIndia.com (@OpIndia_com) December 2, 2022
युवतीने केलेल्या तक्रारीनुसार, ‘३० नोव्हेंबर या दिवशी मी घरगुती साहित्य मागवले होते. दुपारी ३.१० वाजता शाहजाद ऑर्डर देण्यासाठी आला. मी त्याला ‘गुगल पे’वरून पैसे पाठवत असतांना ‘शाहजाद’ माझा ‘व्हिडिओ रेकॉर्ड’ करत होता. त्याचा संशय आल्यावर विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. माझ्याशी लगट करून अनुमतीविना घरात प्रवेश केला. माझा हात पकडून माझ्याशी गैरवर्तन केले. त्याच्याकडे भ्रमणभाषची मागणी केली असता त्याने भ्रमणभाष देण्यास नकार दिला. या वेळी सुरक्षारक्षकाला बोलावल्यावर त्याने शाहजाद याच्याकडून भ्रमणभाष घेऊन मला दिला. त्याच्या भ्रमणभाषमध्ये माझे केलेले चित्रीकरण आढळले.’ युवतीने केलेल्या तक्रारीवर ‘पोलिसांनी तथ्य असल्यास कारवाई करू’, असे उत्तर पाठवले आहे. झेप्टोकडून पाठवण्यात आलेल्या उत्तरामध्ये, ‘हा प्रकार गंभीर आहे. या वर्तनाचा आम्ही निषेध करतो. आमच्या स्थानिक शाखेकडून याची चौकशी करत आहोत. याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू’, असे कळवले आहे. यानंतर या युवतीने पुन्हा ट्वीट करून ‘तुमची स्थानिक टीम मला बोलावून विषय संपवण्यास सांगत आहे. तुम्ही खरंच अशी कारवाई करणार आहात का ? तुमच्यामुळे मला या भयानक प्रसंगातून जावे लागत आहे. ‘झेप्टो’कडून अशीच सेवा दिली जाते का ?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
संपादकीय भूमिकायुवतींनो, अशा वासनांधांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! |