बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्याच्या घरात गावठी बाँब बनवतांना स्फोट ! : ३ कार्यकर्त्यांचा मृत्यू
मिदनापूर (बंगाल) – येथील अर्जुननगर भागात तृणमूल काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी राजकुमार मन्ना यांच्या घरात झालेल्या बाँबस्फोटात पक्षाच्या ३ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले. या स्फोटात मन्ना यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. मन्ना यांच्या घरात गावठी बाँब बनवण्यात येत असतांना हा स्फोट झाला. येथील कांथी भागामध्ये पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या सभा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा स्फोट झाल्याने पोलीस अधिक चौकशी करत आहेत. यापूर्वी ६ नोव्हेंबरलाही राज्यातील डेगांग भागात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या घरात झालेल्या गावठी बाँबच्या स्फोटात २ जण घायाळ झाले होते.
Blast at the residence of TMC leader leaves three dead, BJP says it is bomb-making gone wrong https://t.co/0J6FpDKBnc
— OpIndia.com (@OpIndia_com) December 3, 2022
संपादकीय भूमिका
|