५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला गोवा येथील कु. श्रीनिवास अजित पाटील (वय ८ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. श्रीनिवास अजित पाटील हा या पिढीतील एक आहे !
‘माझा मुलगा कु. श्रीनिवास अजित पाटील (वय ८ वर्षे) याची माझ्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्याला आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
१. देवाची आवड असणे
अ. कु. श्रीनिवासला देवपूजा पुष्कळ प्रिय आहे. तो दत्ताचा नामजप पुष्कळ आवडीने करतो.
आ. तो ‘मी देवाला नैवेद्य दाखवीन आणि बाहेर कावळ्यांना अन्नसुद्धा मीच ठेवीन’, असा हट्ट करतो.
२. धर्माभिमानी
अ. त्याला हिंदु धर्माप्रमाणे कपाळाला टिळा (तिलक) लावायला आणि सात्त्विक वेशभूषा करायला आवडते. त्याला ‘जिन्स-पँन्ट’ घालायला आवडत नाही.
आ. ‘पाकिस्तान आणि चीन या देशांतील वस्तू आपण घेऊ नये’, असे त्याला वाटते आणि तो दुसर्यांनाही या वस्तू घेऊ नका’, असे आवर्जून सांगतो.
३. गाय आणि बैल या प्राण्यांशी त्याची चांगली मैत्री जमते.
४. तो सतत आनंदी असतो.
३. अनुभूती
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवणे, त्यांचे स्मरण करणे आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करणे यांमुळे अंगाची खाज न्यून होणे : एकदा त्याला पूर्ण शरिराला जंगलातील माश्या चावल्या आणि त्याच्या अंगाला खाज येऊ लागली. रात्री झोपेत त्याने खाजवल्याने रक्त आले. दुसर्या दिवशी मी त्याच्या अंगाला तेल लावले. मी त्याला साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवले आणि त्याला परात्पर गुरुदेवांचे स्मरण करायला सांगितले, तसेच मी त्याला ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करत रहा’, असे सांगितले. त्याने तसे केल्यावर त्याच्या अंगाची खाज न्यून झाली.
४. श्रीनिवासचे स्वभावदोष
सकाळी विलंबाने उठणे, पुढे पुढे बोलणे आणि हट्टीपणा’
– सौ. सुरेखा अजित पाटील (श्रीनिवासची आई), होंडा, उत्तर गोवा. (१८.१२.२०२१)
|