‘हिंदु मतपेटी’ निर्माण करा ! – पू. कालिचरण महाराज
कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या वतीने सनातननिर्मित ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, देवतांची सात्त्विक चित्रे आणि नामपट्ट्या यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सातारा, २ डिसेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजातील सर्व ज्ञातीबांधवांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकारण्यासाठी राजनीतीचे ‘हिंदुकरण’ झाले पाहिजे. त्यासाठी जात, प्रांत अन् भाषा विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून संघटित होऊन ‘हिंदु मतपेटी’ निर्माण करावी, असे आवाहन हिंदू धर्मजागरण महासभेचे पू. कालिचरण महाराज यांनी केले.
‘प्रतापगड उत्सव समिती’च्या वतीने वाई (जिल्हा सातारा) येथील महागणपति घाटावर आयोजित ‘शिवप्रतापदिना’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गोरक्षक संजय शर्मा यांना ‘वीर जीवा महाले’ पुरस्कार, तर अधिवक्ता रोशन जगताप यांना ‘पंताजीकाका बोकील’ अधिवक्ता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
पू. कालिचरण महाराज पुढे म्हणाले की, कट्टर हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार सत्तेत आल्यामुळे प्रतापगडावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम यशस्वी झाली. गडावर अफझलखान कबर परिसरात पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी ही विषवल्ली मुळासकट नष्ट केली पाहिजे. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली मतांसाठी मुसलमांचे तुष्टीकरण करणार्या शासनकर्त्यांमुळे देशाचे तुकडे होत आहेत.