सातारा येथे ४ डिसेंबर या दिवशी भव्य ‘हिंदु जनआक्रोश’ मोर्चा !
सातारा, २ डिसेंबर (वार्ता.) – येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी भव्य ‘हिंदु जन आक्रोश’ मोर्च्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोर्च्याचा उद्देश आणि अन्य माहिती सांगण्यासाठी २ डिसेंबर या दिवशी सातारा येथील विश्रामगृहामध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेतली.
शहरातील गांधी मैदान येथून सकाळी १० वाजता मोर्च्याला प्रारंभ होणार असून सातारा जिल्ह्यातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, गणेशोत्सव मंडळे, दुर्गाेत्सव मंडळे, साधू-संत-महंत, देवमूर्ती आदी या मोर्च्यात सहभागी होणार आहेत.
प्रतिदिन हिंदु माता-भगिनींवर प्रेमसंबंधातून हत्या होत आहेत. हिंदु मुलींना प्रेमप्रकरणात फसवून त्यांचे बळजोरीने धर्मांतर करण्याच्या अनेक घटना घडत आहेत. लव्ह जिहाद आणि धर्मांतर समवेतच हिंदूंना परमपवित्र असणार्या गोमातेच्या हत्याही वाढत आहेत. हे हिंदूंच्या अस्तित्वावरचेच थेट आक्रमण आहे. यामुळे हिंदु समाजाची कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्तरावर मोठी हानी होत आहे. हिंदु माता-भगिनींमध्ये पुष्कळ असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या बंदी यांसाठी कडक कायदे बनवून त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. या मागण्यांसाठी ४ डिसेंबर या दिवशी होणार्या भव्य ‘हिंदु जनआक्रोश’ मोर्च्यात सहभागी होऊन प्रत्येक हिंदूने धर्मकर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
(सौजन्य : Satara Guruchya batmya)
पत्रकार परिषदेला उपस्थित मान्यवर
भाजपचे विक्रम पावसकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गणेश मेळावणे, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे, हिंदु जागरण संघटनेचे विक्रम जगदाळे, विश्व हिंदु परिषदेचे रविकुमार कोठाळे, अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे पराग कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राहुल पवार, धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सतीश बापू ओतारी, संकेत शिंदे, भाजपचे माजी नगरसेवक विजयकुमार काटवटे, विकास गोसावी, शिवसेना (शिंदे गटाचे) अमर बेंद्रे