धुळे येथे ‘श्रद्धाचे ३५ तुकडे झाले, तुझे ७० करीन’ अशी धर्मांधाची हिंदु तरुणीला धमकी !
२ धर्मांधांवर गुन्हा नोंद !
धुळे – ‘श्रद्धा वालकर हिचे ३५ तुकडे झाले, तू आमच्या विरोधात गेलीस, तर तुझे ७० तुकडे करीन’, अशी धमकी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (विवाहाविना एकत्र) रहात असलेला धर्मांध अर्शद सलीम मलिक याने २४ वर्षीय हिंदु तरुणीला दिली. या प्रकरणी तरुणीने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी धर्मांध अर्शद आणि त्याचा पिता सलीम बशीर मलिक यांच्यावर ३० नोव्हेंबर या दिवशी गुन्हा नोंदवला आहे. (पाश्चात्त्य संस्कृतीतील ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे अनुकरण केल्यामुळे देशात अशा घटना वारंवार घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी आणि समाजात नैतिकता येण्यासाठी अध्यात्म अन् धर्मशिक्षण यांची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! – संपादक)
Dhule : श्रद्धाचे ३५ तुकडे झाले, तुझे ७० करेन; ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मधील तरुणाची तरुणीला धमकीhttps://t.co/Cq1oAAXez8
— Maharashtra Times (@mataonline) December 2, 2022
१. हिंदु तरुणी आणि अर्शद हे जुलै २०२१ पासून एकत्र रहातात. त्याआधी ४ एप्रिल २०१६ या दिवशी तिचा पहिला विवाह झाला होता. वर्ष २०१७ मध्ये तिला मुलगा झाला. वर्ष २०१९ मध्ये तिच्या पतीचे अपघातात निधन झाले. त्यानंतर तिची हर्षल माळी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्याने तिच्यावर अत्याचार करून त्याची चित्रफीत बनवून तिला धमकावले.
२. त्यांनी एकत्र रहाण्याचा निर्णय घेतल्यावर ते जुलै २०२१ मध्ये ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये अमळनेर येथे प्रतिज्ञापत्र सिद्ध करायला गेले. या वेळी तरुणाचे नाव ‘हर्षल माळी’ नसून ’अर्शद सलीम मलिक’ असल्याचे हिंदु तरुणीला समजले. (हिंदु तरुणींना फसवणारे धर्मांध ! – संपादक)
३. अर्शदने तिला धाराशिव येथे एका घरात नेले. तिथे त्याचे वडील सलीम यांनीही तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. २६ ऑगस्ट २०२२ या दिवशी तिने दुसर्या मुलाला जन्म दिला. त्यानंतरही सलीम यांच्याकडून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार होतच होते.
४. अर्शदने तिचे धर्मांतर करवून घेतले. तिच्या ५ वर्षांच्या पहिल्या मुलाची ‘खतना’ करण्याचाही त्याने प्रयत्न केला; मात्र तिने त्याला विरोध केल्यामुळे अर्शदने तिला २९ नोव्हेंबर या दिवशी देहली येथील श्रद्धा वालकर प्रकरणाची माहिती देऊन वरील धमकी दिली.
५. याआधी सोन्याची पोत मोडण्यास नकार देताच ‘अर्शदने चटके दिले होते’, असेही हिंदु तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|