सावर्डे (तालुका चिपळूण) येथे श्री केदारनाथ आणि देवी मरीआई मूर्तींची विटंबना
सावर्डा येथे तणाव पोलिसांचे जनतेला शांत रहाण्याचे आवाहन
(हे छायाचित्र कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी नव्हे, तर हिंदूंना झालेली धर्महानी लक्षात येण्यासाठी प्रसिद्ध करत आहोत. – संपादक)
चिपळूण, २ डिसेंबर (वार्ता.) – तालुक्यातील सावर्डे येथील ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि देवी मरीआई या मंदिरांतील मूर्तींची विटंबना करण्यात आल्यामुळे सहस्रो ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या घटनेमुळे सावर्डे गावात तणाव निर्माण झाला आहे. ‘विटंबना करणार्यांचा २ दिवसांत शोध घ्या’, अशी चेतावणी ग्रामस्थांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी मात्र जनतेला शांत रहाण्याचे आवाहन केले आहे.
अ. २ डिसेंबरच्या पहाटे सावर्डे येथील ग्रामदैवत श्री केदारनाथ मंदिरातील पुजारी मंदिरात गेले असता त्यांना श्रीदेव केदारनाथ यांच्या मूर्तीवर घाव घातल्याच्या खुणा दृष्टीस पडल्या. हे विपरीत कृत्य झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याविषयी गावातील अन्य लोकांना माहिती दिली.
आ. त्यानंतर गावातील सहस्रो ग्रामस्थ मंदिराच्या ठिकाणी एकवटले. सावर्डे पोलिसांनाही हा प्रकार कळवण्यात आला.
इ. याच परिसरात असणारे देवी मरीआईच्या मंदिरातीलही मूर्तीची विटंबना झाल्याचे नागरिकांना लक्षात आले. या ठिकाणी देवीला अर्पण करण्यात येणारे ध्वज देवीच्या मूर्तीवर जाळण्यात आले आहेत.
ई. श्वानपथक सावर्डे येथे आले असून पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
संपादकीय भूमिका
|