फैजपूर (जिल्हा जळगाव) येथे ‘अखिल भारतीय संत समिती’कडून गोवंश रक्षणासाठी प्रांताधिकार्यांना निवेदन !
जळगाव, २ डिसेंबर (वार्ता.) – सावदा (जिल्हा जळगाव) येथे २८ नोव्हेंबरला भाजप शहर अध्यक्ष श्री. जितेंद्र भारंबे यांच्यासह ५ – ६ गोरक्षकांवर गोतस्करीचे वाहन पोलिसांच्या कह्यात दिले; म्हणून धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले होते. या घटनेच्या निषेधार्थ ३० नोव्हेंबरला ‘अखिल भारतीय संत समिती’च्या वतीने प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात उपरोक्त घटनेचा निषेध करण्यात आला असून ‘यापुढे अशा घटना शहर आणि परिसरात घडूच नयेत’, यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी, तसेच गोमातेचे रक्षण करणे, हा आमचा अधिकार आहे’, असे म्हटले आहे. या वेळी महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज, महामंडलेश्वर जनार्दनहरी महाराज, श्रद्धेय देवमुरारी बापूजी, महावीरजी उपस्थित होते.
सावदा येथील गोसेवकांवर झालेल्या प्राणघातक आक्रमणाच्या घटनेची नोंद घेत पालिका प्रशासनाने शहरातील अवैध पशूवधगृह पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. (पालिकेने वरवरची कारवाई न करता या घटनेच्या मुळाशी जाऊन अनधिकृत पशूवधगृह चालकांवर कठोर कारवाई करायला हवी, हीच जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक) |
(सौजन्य : LiveTrends News)
संपादकीय भूमिकागोरक्षणासाठी संतांना निवेदन द्यावे लागणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! |