शाहरुख खान मूर्तीपूजा करत असल्याचा आरोप करत धर्मांध मुसलमानांकडून सामाजिक माध्यमांद्वारे त्यांना विरोध !
अभिनेते शाहरुख खान यांनी मक्केमध्ये केला ‘उमराह’
(उमराह म्हणजे दर्शन घेणे)
नवी देहली – चित्रपट अभिनेते शाहरुख खान यांनी सामाजिक माध्यम ‘इन्स्टाग्राम’वर त्यांनी मक्का येथे उमराह केल्याची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. त्यावरून काही मुसलमानांनी त्यांच्यावर टीका केली आहे. हज वर्षभरातील एका विशिष्ट काळात केली जाते; मात्र उमराह कधीही जाऊन केला जातो.
#ShahRukhKhan: पूरी हुई शाहरुख खान की सालों पुरानी इच्छा, सफेद चादर लपेट सादगी से किया उमराह, जीत लिया दिलhttps://t.co/htulbjLexh
— Newsroom Post (@NewsroomPostCom) December 2, 2022
१. अमाल नावाच्या व्यक्तीने सामाजिक माध्यमांवरून टीका करतांना लिहिले आहे की, शाहरुख मूर्तीपूजा करतो. घरामध्ये हिंदूंच्या देवतांची मूर्ती ठेवतो. इस्लाममध्ये हे सर्वांत मोठे पाप मानले जाते.
२. रिझ नावाच्या ट्विटर खात्यावर लिहिले आहे की, चित्रपटातून पैसे कमावणे इस्लामनुसार हराम आहे, अशा वेळी त्याचा उमराह कसा स्वीकारता येईल ?
३. मारूफ अहमद याने लिहिले आहे की, शाहरुख अर्धा हिंदु आणि अर्धा मुसलमान आहे. तो पूर्णपणे मुसलमान नाही. त्यामुळे तो उमराह करू शकत नाही.
'मूर्तियों की पूजा करता है, यह इस्लाम में सबसे बड़ा पाप': शाहरुख खान का मक्का में उमराह कट्टरपंथियों को नहीं कबूल, कहा- यह आधा हिंदू, आधा मुस्लिम#ShahRukhKhan #Umrah #Mecca https://t.co/2c2lhTBIqv
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 2, 2022
_____________________________________
संपादकीय भूमिकाहिंदु सर्वधर्मसमभावाने वागतात आणि अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टींचा सन्मान करतात; मात्र अन्य धर्मीय तसे करत नाहीत, हेच वेळोवेळी दिसून येते आणि निधर्मीवादी अन् पुरो(अधो)गामी यावर मौन बाळगतात ! |