अश्लील चित्रपट पाहिल्यानंतर १७ वर्षांच्या मुलाकडून १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या
रायपूर (छत्तीसगड) – अश्लील चित्रपट पाहिल्यानंतर एका १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी बेमेटारा येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली.
A minor boy allegedly raped and murdered a 10-year-old girl residing in his neighbourhood in #Chhattisgarh‘s Bemetara district, police said.https://t.co/yxYMC7N98R
— The New Indian Express (@NewIndianXpress) November 29, 2022
प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, रायपूरपासून ९० किलोमीटर अंतरावरील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलीने गळफास लावल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्रारंभी पोलीस या घटनेकडे आत्महत्येच्या दृष्टीकोनातून पहात होते; मात्र नंतर वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले. या अन्वेषणाच्या वेळी शेजारी रहाणार्या एका मुलावर पोलिसांना संशय आला. मुलाची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची स्वीकृती दिली.
आरोपीने सांगितले की, २६ नोव्हेंबरला त्याने भ्रमणभाषवर बराच वेळ अश्लील चित्रपट पाहिला होता. त्यानंतर तो शेजारच्या घरी गेला. मुलगी घरी एकटी असल्याच पाहून त्याने पीडितेवर बलात्कार केला. या वेळी त्याने पीडितेच्या तोंडात कपडाचा बोळा कोंबला. आपले गुपित उघड होणार या भीतीने या मुलाने पीडितेची ‘स्कार्फ’ने गळा आवळून हत्या केली. हे प्रकरण आत्महत्येचे भासवण्यासाठी आरोपींनी मुलीचा मृतदेह फासावर लटकवला. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका
|