८ देशांतील ९०० गाड्यांचे टायर केले पंक्चर !
पर्यावरणाविषयीच्या जागृतीसाठी अनोखे आंदोलन
लंडन (ब्रिटन) – पर्यावरणासाठी काम करणार्या ‘द टायर एक्स्टींग्विशर’ नावाच्या सामाजिक संस्थेने जगातील ८ देशांमध्ये एक आगळीवेगळी चळवळ चालू केली आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी ९०० गाड्यांचे टायर पंक्चर केले आहेत. यासह त्यांनी गाड्यांवर एक पोस्टरही चिटकवले आहे. यामध्ये टायर पंक्चर करण्याचे कारण लिहिले जाते. याद्वारे पालटते हवामान आणि त्याचे दुष्परिणाम यांकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘द टायर एक्स्टींग्विशर’ने मार्च २०२२ पासून अनुमाने १० सहस्र चारचाकी वाहनांचे टायर पंक्चर केले आहेत. शहरांमध्ये दिवसेंदिवस गाड्यांची संख्या वाढत असून त्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत आहे. हे हवामानासाठी धोकादायक आहे, असे या संघटनेचे म्हणणे आहे.
क्लाइमेट एक्टिविस्ट ग्रुप ‘द टायर एक्सटिंग्विशर’ का अनोखा प्रदर्शन: 900 कारों के टायर पंचर किए, इनका मकसद क्लाइमेट चेंज की ओर ध्यान खींचना#environment #Cars #GlobalWarming https://t.co/hvAt3iLicJ
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) December 1, 2022
अमेरिकेतील न्यूयॉर्क, नेदरलँड्समधील अॅमस्टरडॅम आणि एन्शेड, फ्रान्समधील पॅरिस आणि ल्योन, जर्मनीतील बर्लिन, बॉन, एसेन, हॅनोवर आणि सारब्रुकेन, ब्रिटनमधील ब्रिस्टल, लीड्स, लंडन, स्वीडनमधील मालमो इन्सब्रुक, झुरिच आदी शहरांतील गाड्यांचे टायर पंक्चर करण्यात आले.