भंडारा येथे प्रवाशांकडून विनयभंग होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास करणे सोडून दिले !
भंडारा – जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहगाव येथील शालेय विद्यार्थिनी बसमधून प्रवास करत असतांना बसमधील काही प्रवाशांकडून विद्यार्थिनींना स्पर्श करून त्यांचा विनयभंग करण्यात येत आहे, तसेच हातवारे करून छेड काढण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. त्यामुळे याला कंटाळून विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर २ किलोमीटर प्रवास पायी करत गावी जात आहेत.
मोहगाव येथील शाळेत शिकणार्या या विद्यार्थिनींना राज्यशासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विनामूल्य बस परवाना (पास) दिला आहे; मात्र बसमध्ये गर्दीचा लाभ घेऊन, तसेच सहप्रवाशांच्या रिकाम्या असलेल्या आसंदीवर बसल्यावर काही वाईट वृत्तीच्या प्रवाशांकडून मुलींच्या शरिराला स्पर्श केला जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनी करत आहेत. महामार्गावरून भरधाव धावणार्या वाहनांपासून विद्यार्थिनींना जीव मुठीत धरून पायी प्रवास करावा लागत आहे.
संपादकीय भूमिका
|