‘रिफ्लेक्टर’अभावी ऊस वाहतूक करणार्या वाहनांच्या अपघातात वाढ !
(रिफ्लेक्टर म्हणजे रात्री समोरील जड वाहतूक करणारे वाहन लक्षात येण्यासाठी वाहनांवर लावलेले रेडियम)
बीड – ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक यांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. सर्व साखर कारखान्यांना ऊस पुरवणारे ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी या सर्वांना रिफ्लेक्टर बसवण्याचे आदेश सुरक्षा समितीने दिले आहेत. जी वाहने रिफ्लेक्टर लावणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे बीड परिवहन कार्यालयाने सांगितले आहे.