काय वर्णू मी उपकार गुरुराया ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
काय वर्णू मी उपकार गुरुराया ।
कसे फेडू ऋण तुझे गुरुराया ।। धृ.।।
विष्णूचा अवतार असूनी न सांगे कुणा ।
कर्तेपणा स्वतः न घेतो माझा गुरुराया ।। १ ।।
आगमन तव झाले धर्मस्थापनेसाठी ।
तळमळीचे तू मूर्तीमंत रूप असशी ।। २ ।।
अमृत महोत्सवी झाला श्रद्धापूर्व स्तुतीसुमनांचा वर्षाव ।
न होई चित्त विचलित मुखकमलावरी साक्षीभाव ।। ३ ।।
योगक्षेम वहासी भाव वाढवी साधकांचा ।
अनुभूती देऊन साधकांना रक्षसी सदा ।। ४ ।।
ज्ञान देऊनी घडवसी साधकां ।
जसा जीव कि प्राण ।। ५ ।।
जसे दगडातून देवपण, तसे साधकांना संतपण ।
परि नामानिराळा रहासी माझा गुरुराया ।। ६ ।।
सर्व विषयांचे लिखाण करूनी ।
हिंदु राष्ट्राचा पाईक करण्या ।
स्थूल-सूक्ष्माचा करसी अभ्यास ।
प्रत्यक्ष कृतीचा असे प्रयास ।। ७ ।।
तुझ्यासम नसे कोण अन् न होणे कोण ।
काय नाते आम्हासंगे न जाणे कोण ।। ८ ।।
दर्शन देसी याची देही याची डोळा ।
वर्णन करण्या नसे वाणी ।
माझ्या गुरुराया, माझ्या गुरुराया अन् माझ्या गुरुराया ।। ९ ।।
– श्री. सुभाष स. राणे, मु. कात्रादेवी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. (वर्ष २०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |