गीता जयंतीच्या निमित्ताने श्री मलंगगड ‘भाल गुरुकुल’ येथे रक्तदान शिबिर !
ठाणे, १ डिसेंबर (वार्ता.) – येथील श्री मलंगगड भाविक कल्याणकारी प्रतिष्ठानच्या वतीने ‘गीता जयंती’च्या निमित्ताने ४ डिसेंबर २०२२ या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत श्री मलंग रोड येथील ‘भाल गुरुकुल’ या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन कर्तव्य बजावावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुरेंद्र शंकर भालेकर यांनी केले आहे.