ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस
मुंबई – ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी २ डिसेंबर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस्. मदान यांनी दिली. विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी राज्यातील ७ सहस्र ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती.