नागपूर येथे सुपारी व्यावसायिकांवर ‘ईडी’ची धाड !
नागपूर – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) १ डिसेंबर या दिवशी सकाळपासून शहरातील सुपारी व्यापार्यांवर धाड टाकली. शहरातील सुपारीकिंग छटवाल यांना आसाम पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, ‘दिग्विजय ट्रान्सपोर्ट’चे हिमांशु भद्रा आदींवरही धाडी टाकल्या. धाडीच्या वेळी परिसरात मोठी सुरक्षाव्यवस्था करण्यात आली होती.
विदेशी सुपारीची आयात करणाऱ्या नागपुरातील व्यावसायिकांवर ईडीची छापेमारीhttps://t.co/7PXDcpgw5i#EDraidinNagpur #ABPnagpur
— ABP माझा (@abpmajhatv) December 1, 2022
केरला गल्ली येथील मस्कासाथ ओल्ड कार्पाेरेशन बिल्डिंगमधील ‘गोयल ट्रेडिंग’सह ‘अल्ताफ कलीवाला सुपारी’, ‘वाशिम बावला सुपारी’ आदींकडे धाडीची कारवाई चालू आहे. हे सर्व सुपारी व्यापारी इंडोनेशिया, थायलंड आणि श्रीलंका या देशांतून सुपारी आयात करत होते. यापूर्वीही ते वेगवेगळ्या अन्वेषण यंत्रणांचे लक्ष्य झालेले आहेत. धाडीच्या वेळी ‘ईडी’च्या पथकात मुंबईसह अन्य ठिकाणच्या अधिकार्यांचा समावेश होता.