मुंबईमध्ये गर्दीच्या ठिकाणी मुसलमान युवकांकडून परदेशी युवतीशी अश्लाघ्य वर्तन !
मुंबई – खार येथे ३ मुसलमान युवकांनी स्वत:च्या भ्रमणभाषवरून ध्वनीचित्रीकरण करणार्या दक्षिण कोरियातील एका युवतीचा हात धरून तिला दुचाकीवरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. रात्री ८ वाजताच्या सुमारास भर गर्दीमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी मोबीन शेख (वय १९ वर्षे) आणि महंमद अन्सारी (वय २० वर्षे) यांना पोलिसांनी अटक केले आहे. दोघांनी गुन्हा मान्य केला असून न्यायालयाने दोघांना १ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
एका मुसलमान युवकाने या युवतीचा हात धरून तिला त्यांच्या दुचाकीवर बसण्याचा आग्रह केला. या वेळी दुसरा मुसलमान युवक दुचाकीवर बसला होता. या युवतीने येण्यास नकार दिला, त्या वेळी मुसलमान युवकाने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ती नकार देऊन पुढे निघून गेली. त्यानंतरही त्या दोघांनी मागून दुचाकीवरून येऊन तिला स्वत:समवेत नेण्याचा आग्रह केला; मात्र तिने पुन्हा नकार दिला. हा सर्व प्रकार तिच्या भ्रमणभाषवर चित्रीत झाला असून सामाजिक माध्यमांवरून प्रसारितही करण्यात आला आहे. याविषयी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही.
खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
South Korean YouTuber harassed in Mumbai’s Khar area, 2 arrested for sexual harassment. The police said the accused have been identified as Mobeen Chand Mohammad Shaikh and Mohammad Naqeeb Sadrealam Ansari and have been booked for molesting the influencer. @Mumbaikhabar9 pic.twitter.com/CXRTHG8aHb
— 𝕄𝕣.ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) December 1, 2022
या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर प्रकार गंभीर असल्यामुळे खारघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्या तरुणीसमवेत चुकीचा प्रकार घडला, तिच्याशी पोलिसांनी संपर्क साधला आहे.
संपादकीय भूमिकापरदेशी युवतीशी असे वर्तन करून जगात भारताला अपर्कीत करणारे वासनांध ! अशांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! |