नागपूर कारागृहातील पोलिसांकडून बंदीवानांना गांजा आणि भ्रमणभाष यांचा पुरवठा !
१० ग्रॅम गांजासाठी ५ सहस्र, तर प्रतिमिनिट संपर्कासाठी आकारले १०० रुपये !
नागपूर – येथील मध्यवर्ती कारागृहात ‘व्हॉट्सअॅप’च्या माध्यमातून बंदीवानांच्या मागणीनुसार गांजा, ड्रग्स, भ्रमणभाष संच, पेय, खर्रा (तंबाखू) आणि सिगारेट अशा वस्तू पुरवण्यात येत होत्या. गुन्हे शाखेने या जाळ्याचा छडा लावला असून २ पोलीस कर्मचार्यांसह ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी कुख्यात गुंड श्रीकांत थोरात, गोपाल पराते, राहुल मेंढेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी अजिंक्य राठोड आणि प्रशांत राठोड यांना अटक करण्यात आली आहे. श्रीकांत थोरात, गोपाल पराते आणि राहुल मेंढेकर या तिघांवरही मोक्का आणि अन्य कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. काही दिवसांनंतर ते कारागृहाबाहेर आले होते. या घटनेतील अन्य आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ३० नोव्हेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली.
Nagpur: चक्क मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडे सापडला गांजा व मोबाईलच्या बॅटरीज!#Nagpur #NagpurNews #MarathiNews #LokshahiNews https://t.co/eimP2o7Vvk
— Lokshahi Marathi (@LokshahiMarathi) September 7, 2022
१. कारागृहात बंदीवानांना सर्व साहित्य पुरवणार्या टोळीने प्रत्येक वस्तूसाठी वेगळे दर निश्चित केले होते. १० ग्रॅम गांजासाठी ५ सहस्र रुपये, प्रतिमिनिट कॉलसाठी १०० रुपये, तसेच सिगारेट आणि खाण्या-पिण्याच्या अन्य वस्तूंसाठी ५ ते १० सहस्र रुपये आकारले जात होते.
२. कारागृहात बंदिस्त असलेले श्रीकांत थोरात, गोपाल पराते आणि राहुल मेंढेकर यांनी कारागृहातून गांजा अन् काही अन्य वस्तूंची मागणी एका चिठ्ठीद्वारे कारागृह पोलीस कर्मचारी प्रशांत राठोड यांच्याकडे दिली होती.
३. ती चिठ्ठी ‘व्हॉटस्अॅप’वर कारागृहाबाहेर असलेल्या अजिंक्य राठोड नावाच्या कारागृह पोलीस कर्मचार्याला पाठवण्यात आली. ती चिठ्ठी बाहेरील एका हातगाडीवाल्याला मिळत असे. अशाप्रकारे बंदीवानांना गांजा पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली.
४. राठोड अन्य पोलीस कर्मचार्यांच्या माध्यमातून गांजा थेट बंदीवानांपर्यंत पोचवत. याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली.
५. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या नेतृत्वाखालील पथकाला कारवाई करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही कारागृह पोलीस कर्मचार्यांना कह्यात घेऊन वरील वस्तू जप्त केल्या.
संपादकीय भूमिकायावरून पोलिसांची गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून येते ! यास उत्तरदायी असलेल्या पोलिसांना आजन्म कारागृहात टाका ! |